सोसायटीतील फ्लॅटमध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक

0

पिंपरी : वाकड पोलिसांनी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

नितीन दिलीप शिंदे (34, रा. तमारा हाऊसिंग सोसायटी, नखातेवस्ती, रहाटणी), राजु रुजाजी पडांगळे (40, रा. बौद्धनगर, पिंपरी), मिलींद गोपीनाथ खानविलकर (47, रा. आर. बी. कदम रोड, घाटकोपर, मुंबई), साईकुमार शिवराय आयाशेट्टी (32, जांभुळवाडी, आंबेगाब कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शनिवारी रात्री गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सागर सुर्यवंशी यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नखातेवस्ती, रहाटणी येथील तमारा हाऊसिंग सोसायटीमधील 903 क्रमांकाच्या फ्लॅटवर छापा मारला. त्यावेळी आरोपी रमी जुगार खेळत असताना मिळून आले.

आरोपीकडून पोलिसांनी तीन लाख रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य जप्त केले आहे. तसेच त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनयम कलम 4 (अ), 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अतिरिक्‍त आयुक्‍त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्‍त आनंद भोईटे, सहायक आयुक्‍त गणेश बिरादार, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक एस एम पाटील, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी मारणे, कदम, नरुटे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.