लूटमार प्रकरणी सराईत चौघांना अटक

0

पिंपरी : कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. दरोड्याचा गुन्ह्यात चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री पावणे दोन वाजता भूमकर चौकाजवळ घडली.

सलमान साबीर शेख (21), शुभम श्रीकांत जाधव (19), प्रेम बालाजी पोतदार (19), ललित हरिकेस करोटीया (20, सर्व रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या एक अनोळखी साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब कोंडीबा बंडगर (वय 28, रा. काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅब चालवतात. त्यांना शुक्रवारी रात्री प्रवासी भाडे आले. ते प्रवाशांना पुण्यातून घेऊन मुंबईला निघाले. रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास भूमकर चौकातून यु टर्न घेऊन सर्व्हिस रोडच्या कोप-यावर आले असता आरोपींनी दुचाकी कारला आडवी लावून कार थांबवली. त्यानंतर फिर्यादी बंडगर यांना चाकूचा धाक दाखवून खिशातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 15 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या टोळीकडून आणखी काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.