शहरातील कोविड बाधित रुग्णांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आणखी चार स्मशानभूमी

0
पिंपरी : संपूर्ण शहरामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहरातील कोविड बाधित रुग्णांचा मृत्युव दरही दुप्पटीने वाढलेला आहे. अंत्यसंस्कारासाठी शहरातील स्मशानभूमीध्ये मृतदेह दहन करण्यासाठी मोठी रांग लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी खुप वेळ लागत आहे.

सद्यस्थितीमध्ये कोरोनामुळे मृत पावणाऱ्या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी निगडी स्मशानभूमी, सांगवी स्मशानभूमी, भोसरी स्मशानभूमी, लिंकरोड चिंचवड स्मशानभूमी व नेहरुनगर स्मशानभूमी या ठिकाणी विद्युत दाहिनीसह लाकूड सरणावरती अंत्यविधी करण्यास मान्यता यापूर्वीच देण्यात आलेली आहे.

तरी सुध्दा अंत्यविधीसाठी लागणारा विलंब लक्षात घेता मा.आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी आणखी ४ स्मशानभूमी मध्ये देखील कोरोना बाधित मृतदेहांवर पुढील आदेश होईपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिलेली आहे.

त्या स्मशानभूमी

१) मोरवाडी स्मशानभूमी
२) काळेवाडी नदी जवळील स्मशानभूमी
३) पिंपळे गुरव स्मशानभूमी
४) पिंपरी नगर (काळेवाडी पुलाजवळील) स्मशानभूमी

या ठिकाणी देखील कोविड बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोविड बाधितांचे मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड सरण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्मशानभूमीतील काळजीवाहक यांची राहणार आहे. अशी माहिती प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.