भारतात BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण, राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली : भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 23 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, ‘आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. सध्या चीन आणि भारतामध्ये थेट विमानसेवा नाही पण लोक इतर मार्गाने भारतात येत आहेत. अशा परिस्थितीत नवा विषाणू भारतात प्रवेश करू नये आणि नागरिकांना प्रवासातही कोणताही अडथळा येणार नाही यावरही आम्ही भर देत आहोत.