नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला ई-मेल किंवा मेसेजद्वारे जॉब ऑफर येत असतील तर त्याची शहानिशा करण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबग गृह मंत्रालयाने अशा फ्रॉड किंवा सायबर क्राईम संदर्भात एक अलर्ट जारी केला आहे.
सरकारच्या अलर्टनुसार काही फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती ऑनलाईन नोकरीच्या (online jobs) संधीसंदर्भात सरकार किंवा कॉर्पोरेट संस्था, कंपन्या यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत.
सायबर हॅकर, चोर असे ईमेल पाठवून, तुमची पर्सनल माहिती गोळा करुन तुमची फसवणूक करु शकतात. त्यामुळे आपण असे ईमेल हाताळण्यापूर्वी त्याची चौकाशी करण्याची गरज आहे.