पंधरा लाखांची फसवणूक, दुकानावर ताबा मिळवून जीवे मारण्याची दिली धमकी

0

पिंपरी : दुकानाची खोटी कागदपत्रे घेऊन 15.63 लाख रुपये उसने घेऊन एकाची फसवणूक करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना हिंजवडी येथे घडली.

याबाबत विलास चव्हाण (37, रा. बावधन खुर्द,  पुणे) यांनी हिंजवडी पोलिसांना फिर्याद दिली आहे. अक्षय धनवे  (रा. कोथरूड) या आरोपी विरोधात भा.द.वि कलम 420, 406, 467, 468, 471, 506 अन्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, की आरोपीने फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणास्तव उसनवारी पैशाची मागणी केली. त्याप्रमाणे विश्वासाने त्यास 15.63 लाख रुपये रक्कम दिली. तर फिर्यादी भरत असलेले बँकेचे पुढील 25 कर्जाचे हप्ते परत न करता मी पैसे देणार नाही, तुला काय करायचं ते कर, मला माझ्या पद्धतीने काय करायचं ते करतो, तुला दुकान खोलून देणार नाही, गोळ्या घालीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.

त्याचप्रमाणे फिर्यादीच्या मालकीच्या वरील दुकानाच्या नावे खोटी बनावट कागदपत्रे बनवून, त्याद्वारे दुकानावर कर्ज काढले तसेच फिर्यादीचे दुकान त्याच्या असल्याचे भासवून गुमास्ता लायसन्स काढून फसवणूक केल्याची घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.