व्यवसायाच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक

0

पुणे : व्यवसायात भागिदारीचे आमिष दाखवून व्यावसायिक पती-पत्नीची 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रविवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या माहिती नुसार वाकड पोलीस ठाण्यात रवींद्र मारुती त्र्यंबके (31, रा. मुकाई चौक, रावेत), चंद्रमणी लोखंडे (रा. अंबरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2018 ते 14 मार्च 2019 या कालावधीत नखातेनगर, थेरगाव येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला भागीदारीत लिफ्ट प्रोजेक्टचा व्यवसाय करू असे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून 38 लाख 35 हजार 50 रुपये घेतले. फिर्यादी यांचे नातेवाईक आणि मित्रांकडून घेतलेले पैसे आणि घरातील सोने असे 14 लाख 65 हजार रुपये पुन्हा आरोपींना दिले.

फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपींना 53 लाख 50 रुपये दिले. आरोपींनी व्यवसायातील नफा म्हणून 16 लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादींना परत दिले. उर्वरित गुंतवलेली 37 लाख 50 रुपये रक्कम न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या प्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.