हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने 52 लाखांची फसवणूक

0

पिंपरी : हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आश्वासन देऊन 52 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पती-पत्नी विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी श्रीकांत विठ्ठलराव गिरी (33, रा. चिखली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर जितेंद्र वेदप्रकाश पुरी उर्फ जितराज पुरी उर्फ बॉबी पुरी, सुरभी मिश्रा उर्फ सुरभी जितेंद्र पुरी उर्फ चेतना उदय इलापाते (दोघे रा. गहुंजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या हॉटेल व्यवसायात फिर्यादी यांना भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवले. त्याबाबत आरोपी आणि फिर्यादी यांच्यात करारनामा देखील झाला.

त्यानंतर वेळोवेळी आरोपींनी 20 लाख 85 हजार रुपये बँक खात्यावर आणि 30 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना भागीदारी न देता त्यांची 52 लाख 400 रुपयांची आरोपींनी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.