क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

0

पिंपरी : रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख45 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत किवळे येथे घडली.

यशपाल दिलीप बनसोडे (वय 37, रा. किवळे. मूळ रा. आंदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला, महेश अग्रवाल, आदित्य बन्सल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका आरोपी महिलेने टेलिग्रामवर पार्टटाईम जॉबसाठी एक लिंक पाठवली. त्यानंतरअन्य आरोपींनी क्रिप्टो करंसी मध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनीवेगवेगळ्या बँक खात्यावर, युपीआय आयडीवर सहा लाख 45 हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणताही नफाअथवा गुंतवलेली रक्कम देता फिर्यादी यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.