नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्पष्ट केले आहे.
खासगी रुग्णालय 150 रुपयांच्या वर लसीचे पैसे घेऊन शकत नाही. या किमतीवर नियंत्रण राज्य सरकारांनी ठेवावं, असं मोदी म्हणाले आहेत. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं आहे.
दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला मोफत राशन
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल.
पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
– आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची
– केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार
– केंद्राच्या नियोजनानुसार लसीकरण सुरु
– १८ वर्षांवरील सगळ्यांचं मोफत लसीकरण, केंद्र लस मोफत देणार
– १ मेपासून लसीकरणाचं २५ टक्के काम राज्यांवर सोपवलं
– राज्यांजवळील २५ टक्के कामंही केंद्र करणार
– जानेवारी ते एप्रिलपर्यंत राज्यांना लसी पोहोचवल्या
– २१ जूनपासून १८ वर्षांवरील नारगिकांचं लसीकरण
-भारतात नेझल लसींच्या निर्मितीवर भर
-परदेशातून लस भारतात आणण्यावर भर
– कोरोना लसींचा पुरवठा वाढणार
– देशात कोविड योद्ध्यांचं लसीकरण पुर्ण
-परदेशी कंपन्यांसोबत करार केले
– जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील. २०१४ नंतर लसीकरणाचा वेग वाढवला.
– देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान
– देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
– कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली
– कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवचं
– एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती
– देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण
– जगात भारत लसीकरणात मागे नाही
– कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा
– ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत घेतली
– मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती