मित्रानेच केला मित्राच्या खुनाचा प्रयत्न

0

पिंपरी : मित्रासोबत फेरफटका मारत असताना, दगड व लाकडी ओंडका डोक्यात घालून मित्रानेच खुनाचा प्रयत्न केला. ऐश्वर्या हॉटेलच्या मागे, माळवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे रविवारी (दि.27) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेश प्रकाश ढोमणे (35, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे.  तीस वर्षीय महिलेनं याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती व आरोपी दिनेश हे मित्र असून, रविवारी सायंकाळी बाहेर फेरफटका मारत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला लाकडी ओंडक्याने मारहाण केली. फिर्यादी सोडविण्यासाठी गेले असता त्यांना ढकलून दिले. शेजारीच असलेला दगड उचलून याला आता सोडत नाही, खल्लास करतो असे म्हणून दगडाने मारहाण केली. आरोपीला अटक केली असून, तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.