इंस्टाग्रामवरील मैत्री, प्रेम आणि पुढे भयानक

0

पुणे : एका पंधरा वर्षे अल्पवयीन मुलीची instagram या सोशल मीडियावरून एका तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या तरुणाने या तरुणीची इच्छा नसतानाही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातूनही पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीस वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रोहन मनू दास असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा सर्व प्रकार आंबेगाव बुद्रुक येथे मार्च ते मे 2022 यादरम्यान घडला.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीची जानेवारी 2022 मध्ये इंस्टाग्रामवर आरोपी मनुदास याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून दोघेही एकमेकांना भेटू लागले.

आरोपीने या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचा विरोध असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या सर्व प्रकारातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.