मोक्का मधील फरार आरोपी गजाआड

0
पिंपरी : गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे आणि मोक्का अंतर्गत कारवाई केली असताना मोकाट फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
सुरेश उर्फ बॉबी विलास यादव (30, रा. पांढरकर चाळ, आकुर्डी) आणि कल्पेश संदीप पवार (24, रा. पंचतारानगर, आकुर्डी) या दोघांना अटक केली आहे.  यातील यादव याच्यावर गंभीर स्वरूपाचे 13 तर पवार याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; बॉबी यादव आणि कल्पेश पवार हे दोघे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. यांच्यावर पिंपरी पोलीस आयुक्तालयातून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तेंव्हापासून हे दोघे फरार आहेत. या दोन गुन्हेगारांची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.