मोक्का कारवाईत फरार सख्या भावांना अटक

गुंडा विरोधी पथकाची शतके पार कामगिरी

0
पिंपरी : मोक्का कारवाईत फरार असणाऱ्या सख्या भावांना गुंडा विरोधी पथकाने नोएडा, दिल्ली येथून अटक केली आहे. या पथकाची स्थापना झाल्यापासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल 103 गुन्हेगारांना पकडून शतके पार कामगिरी केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या पथकास 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

 

जतीन बिपीन टाक आणि तरुण उर्फ मोनू बिपीन टाक या दोघांना अटक केली आहे. पिंपरी येथील एका व्यवसायिकाला धमकावून त्याच्याकडून 5 हजार रुपये घेण्यात आले होते, तसेच पोलीसांकडे तक्रार दिल्यास तुला बघून घेतो असा दम दिला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यामध्ये यापूर्वी सनी सौदाई आणि राजू टाक या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून हे दोघे फरार होते.

 

या दोघांची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. जतीन टाक याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत.

 

शहरातील गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुंडा विरोधी पथकाने नावास साजेसे काम केले असून आता प्रयत्न 103 गुन्हेगारांना पकडले आहे. या पथकाने एवढ्यावरच न थांबता आणखी चांगले काम करायचे आहे असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

 

या पथकाने मोक्का कारवाईमध्ये पाहिजे असणारे 19, खुनाच्या गुन्ह्यातील 5, खुनाचा प्रयत्न 10 , बेकायदेशीर हत्यार बाळगणे 16, कोयता, तलवार हत्यार बाळगणे 14, तडीपार 10 आणि पाहिजे असणारे 19 गुन्हेगार अटक केले आहेत.

 

ही कामगिरी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक हरिष माने, अंमलदार हजरत पठाण, विक्रम जगदाळे, शाम बाबा, नितीन गेंगजे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.