पुणे : आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा प्रयत्न करून परिसरात दहशत निर्माण करणार्या ठोंबरे टोळीच्या मुख्य सुत्रधार आणि मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेल्यास तेलंगणामधील हैदराबादमधून अटक केली आहे.
सूरज अशोक ठोंबरे (22, रा. 260, धनगरवाडा, नाना पेठ) याला पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. न्यायालयाने ठोंबरेला 5 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आदित्य अमर उकरंडे (16, रा. नाना पेठ, डोके तालीम, पुणे) याने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यापुर्वी पोसिलांनी ओंकार गजानन कुडले (21, रा. 767, गणेश पेठ, बांबू आळी, महाराणा प्रताप जिम शेजारी), कानीफनाथ विनोद महापुरे (23, रा. नाना पेठ, डोके तालीम), राजन मंगेश काळभोर (22, रा. मोहननगर, धनकवडी), गोटया उर्फ नरसिंग भिमा माने (28, रा. तोरणा हौसिंग सोसायटी, हिंगणेमळा, ससाणेनगर, हडपसर) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (36, रा. अशोक चौक, नाना पेठ) यांना अटक केली होती.