पोलीस आयुक्तालयात वाहन खरेदीसाठी दोन कोटीचा निधी : चंद्रकांत पाटील
पोलीस आयुक्तालय, आयुक्त यांच्या कामगिरीवर पालकमंत्री समाधानी
पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आढावा शुक्रवारी घेतला. यावेळी आयुक्तालयासाठी लागणाऱ्या वाहनांच्या खरेदीसाठी 2 कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. तसेच यावेळी दामिनी पथक कार्यान्वित केले आहे. आयुक्तालायच्या कार्यालय प्रांगणात हिरवा झेंडा दाखवून या पथकाला कार्यान्वित केले आहे.
पोलिसांनी आयुक्तालयाबाबत संपूर्ण माहिती पालकमंत्री पाटील यांना दिली. तसेच त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीची माहितीही दिली. यामध्ये अल्पवयीन मुलांसाठी सुरु केलेली योजना, गुन्हेगारांची माहिती आणि गुगल ट्राकिंग सिस्टीम, गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी केलेल्या उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस आयुक्तालय आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या कामगिरीबाबत पालकमंत्री पाटील यांनी समाधानी व्यक्त केले आहे. तसेच इतर समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
दामिनी पथकाबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, “आपल्याकडे दामिनी पथक नव्हते. ते आज पालकमंत्र्यांनी कार्यान्वित केले आहे. या पथकासाठी शासनाने आपल्याला बाईक्स दिलेल्या आहेत.”
या दामिनी पथकाला आज 12 बाईक देण्यात आले आहेत. या बाईक्स चालण्यासाठी 24 महिलांना मोटर डिपार्टमेंटच्या पोलीस निरीक्षकांनी प्रशिक्षण दिले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये चार एसीपी डिव्हिजन आहेत. पिंपरी, वाकड, चाकण आणि देहूरोड असे ते चार डिव्हिजन आहेत. प्रत्येक डिव्हिजनला तीन बाईक देण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की, “आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की शासनाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वाहन खरेदीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्या आहे. या निधीतून आपण दुचाकी लाईट राईस आणि चार चाकी वाहने खरेदी करणार आहोत.”