भारतात ड्रग्जच्या विक्रीतून दहशतवादासाठी फंडिंग

0

मुंबई : ड्रग्ज बनवणाऱ्या आणि विक्री प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तकाना मुंबईत एनसीबीच्या पथकाने पकडले. यांच्या कडे चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत तब्बल १,५०० कोटींचे ड्रग्ज विकले असून हे पैसे दहशतवादी फंडिंगसाठी दिला जात असल्याचे समोर आले आहे.

एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. या डायरीतून दाऊदच्या देशभरातील कनेक्शनचा लेखाजोखा असल्याचेही समोर आले.

ड्रग्ज तस्करीसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागली असून, अनेक तस्करांचे आणि सेवन करणाऱ्यांची नावे समोर आली. यामध्ये काही उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्याही नावाचा समावेश आहे. यांच्याकडेही एनसीबी लवकरच चौकशी करेल.
गेल्या अनेक महिन्यांपासून दाऊदला या ड्रग्ज विक्रीतून हवालामार्गे पैसे पाठविण्यात येत होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दहशतवादासाठी ही फंडिंग सुरू होती. गेल्या पाच वर्षांत तब्बल १,५०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची विक्री करण्यात आली आहे. शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पुन्हा डोंगरी परिसरात ४ ठिकाणी छापे टाकले. यात दाऊदच्या ड्रग्स अड्ड्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दाऊदच्या आणखी एका हस्तकला अटक केल्याचा दावा वानखेडे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.