पिंपरी : दरोडयाच्या तयारीत असलेल्या गवळी टोळीच्या म्होरक्यासह सराईत गुन्हेगारांना धारदार शस्त्रांसह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 16)रोजी करण्यात आली आहे.
आनंद उर्फ दादया राजू गवळी (20,रा. जिवलग हौसिंग सोसायटी बिल्डींग चौक निगडी), दिपक अरुण चांदणे (22, रा. ओटास्किम निगडी ), सागर रामदास जाधव (21, रा . राहूलनगर पवळे शाळेजवळ बिल्डींग नंबर-12 ओटास्किम निगडी व त्यांचे 2 रेकॉर्डवरील अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करुन त्यांचे हालचालीवर पाळत ठेवण्याबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे . गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने गुन्हेगार चेकींग करुन गुन्हेगारांच्या हालचालीवर पाळत ठेवली होती.
गुरुवारी गवळी टोळीचे इतर सराईत साथीदारांसह रात्री निगडी भागात ट्रान्सपोर्टनगर परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार आहेत सध्या ते सर्वजण भिमाईनगर ओटास्किम निगडी येथे एकत्र जमुन दरोडयाच्या धारदार शस्त्रांची व साहीत्याची जुळवा जुळव करुन दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2 चे सपोफी शिवानंद स्वामी, केराप्पा माने, पोहवा प्रमोद वेताळ, जयवंत राऊत पोना नामदेव कापसे, आतिष कुडके , पोकॉ अजित सानप , शिवाजी मुंढे यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी एक धारदार लोखंडी तलवार ,दोन धारदार लोखंडी कोयते ,एक लोखंडी रॉड ,दोन मिरची पावडर पुड , दोर , मोबाईल , रक्कम असे जप्त केले आहे.