धक्कादायक! नाशिकमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

0

नाशिक ः देशांच्या विविध भागांमध्ये स्त्रियांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. नाशिकमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना नुकतिच घडलेली आहे. या घटनेमुळे नाशिक शहर हादरलेले  आहे.

नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. मुलीला चाकूचा धाक दाखवून हा बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी सात संशयितांनी अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे. घटना घडल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांमध्ये तत्कार दिली. तक्रारीनंतर ६ संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.