गॅस कटरने ATM फोडले, चोरट्यांनी 23 लाखांची रोकड पळवली

0

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत गावातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने अलगदपणे एटीएम फोडलं आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड पळवली आहे. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.