मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असे सांगितले आणि भाजपचे कितीतरी लोक धडाधडा रडायलाच लागले. कुणालाच काही कळेना. कारण तो संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. गिरीश महाजन यांचं रडणं अजूनही बंद होईना. फेटा बांधायला दिला तर ते फेटा सोडतात आणि डोळ्यांचे पाने पुसण्यासाठी वापरतात. त्यांना सर्वाधिक वाईट वाटलं. पण आता काय करता, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या जखमीवर मीठ चोळले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावाच्या भाषणात अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चिमटे काढले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागल्याची पार्श्वभूमी त्यामागे होती. अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आम्हीही पाहिली. त्यात त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील. त्यावेळी एकदम पीन ड्रॉप सायलन्स झाला आणि भाजपचे कितीतरी लोक धडाधडा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. कारण तो संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. गिरीश महाजन यांचे रडणं अजूनही थांबलंलं नाही. फेटा बांधायला दिला, तर तो फेटा सोडतात आणि डोळ्याचे पाने पुसण्यासाठी वापरतात. त्यांना सर्वाधिक वाईट वाटलं. पण आता काय करता, असा सवाल करत भाजपमधील फडणवीस समर्थकांच्या जखमेवर मीठ चोळले.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काम केले आहे. राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते. आमच्याकडे आल्यावर ते माझ्या जवळचे झाले आणि भाजपमध्ये गेल्यावर ते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय झाले आहेत. त्यांची ही एक कला आहे. आज त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनीही त्यांना असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
अजित पवार म्हणाले की, भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांना जमले नाही, ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षांत करुन दाखवले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. नार्वेकर यांना संसदीय कायद्याची उत्तम जाण आहे. तसेच ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर खऱ्या अर्थाने कायद्याची जाण असलेले अध्यक्ष आपल्याला मिळाले आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून कायद्याचे पालन करत असताना दोन्ही बाजूंच्या सदस्याना संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा सर्व सदस्यांच्यावतीने व्यक्त करतो.