शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या : राहूल गांधी 

0

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात काढलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी सरकारावर निशाणा साधत म्हंटले आहे की, “जागे व्हा. अंहकराच्या खुर्चीवरून विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या”, असे गांधी आपल्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे.

राहूल गांधी पुढे म्हणतात की, ”अन्नदाते रस्त्यावर उतरले आहेत आणि पंतप्रधान टिव्हीवर खोटं भाषण देत आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट हे आमच्या डोक्यावरील कर्ज आहे. आणि हे कर्ज आपण त्यांना त्यांचा न्याय आणि हक्क दिल्यानंतरच फिटेल. त्यांच्यावर अश्रूधूर आणि लाठीचार्ज करून हे कर्ज नाही फेडू शकत.”

यासंदर्भात काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी म्हटले आहे की, “नाव शेतकरी कायदा आणि फायदा मात्र अब्जाधीश मित्रांचा. शेतकऱ्यांशी चर्चा न करता शेतकरी कायदा तयार कसा होऊ शकतो. सरकारला शेतकऱ्यांचे म्हणणे एेकावे लागेल. सर्व जण मिळून शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवू”, असे प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.