पत्रकारांना लस मोफत द्या : आमदार लक्ष्मण जगताप

0
पिंपरी : राज्यातील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी कोरोना संक्रमणाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत . त्यामुळे सर्व पत्रकारांना कोरोना लसीचे संरक्षण मिळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे . कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर सरकारमार्फत पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी , डॉक्टर , पोलीस यांना लस देण्यात आली.

आता 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत आहे . मात्र , पत्रकारांना कोरोना लस देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर अद्यापही निर्णय झालेला नाही . कोरोना योद्धांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाहीत . पत्रकारही स्वत : चा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत . पत्रकार वृत्तसंकलनासाठी जातात तेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतात .

पत्रकारांनाही राज्य सरकारने कोरोना लस देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर अद्यापही निर्णय झालेला नाही . कोरोना योद्धांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाहीत . पत्रकारही स्वत : चा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत . पत्रकार वृत्तसंकलनासाठी जातात तेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतात . त्याचप्रमाणे त्यांना वृत्तसंकलनासाठी विविध रुग्णालयांमध्ये सुद्धा जावे लागते . त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते .

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे . त्यामुळे सरकारने डॉक्टर्स , नर्स , पोलीस , आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकारांनाही कोरोना लस मोफत द्यावी , अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.