कोल्हापूर ः “कृषी कायदा बदणार नाही, असे म्हणणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की, कृषीमंत्री? मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत”, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम करताहेत तोपर्यंत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही ”हिंमत असेल तर, बांधावर जा, शेतकरी पायातंल काढून तुम्हाला सांगेल”, अशा शब्दांत दोघांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाषा साधला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. याला महाविकास आघाडीतील नेत्यांंनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ म्हणाले की, ”जनतेने अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पाळावा. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात या आंदोलनाला तीव्रता नाही, असे सांगितले आहे. पण, मूळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर आणि इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषीमंत्री असताना केलेले आहेत.”
सतेज पाटील भाजपाच्या प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका करताना म्हणाले की, ”प्रत्येकांना बंदाला पाठिंबा द्या. घरासमोर काळा झेंडा लावा. कायदा बदलणार नाही, म्हणणारे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. हिंमत असेल बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सांगा. मग, शेतकरी पायातील काढून कायदा कसा चुकीचा आहे, हे सांगतील”, अशी टीका सतेज पाटील चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.