नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दर अचानक गगनाला भिडला होता. त्यानंतर काही दिवसात किंमतीमध्ये घट होत आहे. पुढील दोन महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता असून
New Delhi
२०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याची चमक अचानक गायब होऊ लागल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या आठवड्यात सोन्याचा ४ डिसेंबरचा वायदा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. शेवटच्या दिवशी सोन्यामध्ये ४११ रुपयांची घट नोंदविली गेली. गुरुवारी सोने 48517 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. हा दर सोन्याच्या उच्च पातळीपेक्षा 8200 रुपयांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ३० ऑक्टोबरला सोन्याचा दर 50699 रुपये प्रति १० ग्रॅम होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून 52167 रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला 48106 रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घट झाली आहे. पुढे कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसा काढून घेऊ लागले आहेत.
जसजशी कोरोना लस बनविण्याच्या आशा आणि तयारी सुरु झाली आहे, तसतशी ती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या शक्यताही वाढू लागल्या आहेत. यामुळे सोन्याच्या दरात त्या प्रमाणात घट दिसणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार फेब्रुवारी २०११ पर्यंत सोन्याचे दर हे ४२००० रुपये प्रति १० ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर चांदीच्या दरातही घट दिसण्याची शक्यता आहे. कारण याचकाळात कोरना लसीचा पहिला टप्पा वितरण आणि लसीकरण होण्य़ाची शक्यता आहे.