सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

0

मुंबई : जगात कोरोनाचे अनिश्चित वातावरण आहे. अशावेळी गुंतवणूक कुठे करणं हे महत्वाचं आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन ते 60 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून ते 47,864 रुपयांवर पोहोचले आहे. एकाच महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3,674 रुपयांनी वाढला आहे. एप्रिल महिन्यात चांदीच्या भावातही 11 टक्क्यांनी म्हणजे 5,948 रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोना काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट देशभरात पसरली आहे. या अस्थिर आणि अनिश्चित वातावरणाचा सगळ्यांवरच मोठा परिणाम होत आहे. नागरिकांमध्येही कोरोनाची भीती आहे. अस असताना शेअर बाजारातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार आता सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

कोरोनामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका शेअर बाजाराला देखील बसला आहे. शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून आता सोन्यात खरेदी करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची घसरण होत आहे. देशात रुपयाच्या तुलनेतही डॉलर घसरण आहे. मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केल्यास मौल्यवान धातूंमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याची किंमत प्रति 1792 डॉलरच्यावर गेली आहे.  महागाईच्या आकड्यांनीही आठ वर्षांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. सोने-चांदीत तेजी आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.