गोल्डन मॅन गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

0

पुणे : पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गोल्डन मॅन सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे.

सचिन नाना शिंदे (२९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सचिन याच्यावर मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेजवळ गोळीबार करण्यात आला. अॅक्टिव्हावरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने शिंदेवर गोळी झाडली.

गोळी शिंदे याच्या मानेजवळ गोळी लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता.

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.