बातमी आनंदाची! १६ जानेवारीपासून करोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार 

0

नवी दिल्ली ः केंद्राने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या करोना लसींना आपतकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज करोना लसीकरणाबद्दल महत्वाची घोषणा केली आहे. येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

या लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचारी आणि करोनायोद्ध्यांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३ कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना सरकाने आखली आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्ध्यांना लसीकरणात पहिले प्राधान्य असेल. त्यांची संख्या तीन कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाचे लोक. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे”, असे केंद्राने म्हटलेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.