डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, TAIT परीक्षेची घोषणा

0

मुंबई : रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा झाली आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

मागील पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी केव्हा होणार? असा प्रश्न डीएड (D.Ed) आणि बीएड (B.Ed) उमेदवारांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांच्या तारखांची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान ऑनलाईन अभियोग्यता चाचणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आठ फेब्रुवारी अशी आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे. या संगणकीय प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने 2017 मध्ये घेतला होता. त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये TAIT परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर अजून पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहेत. मात्र परिषदेकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.

वेळापत्रक काय आहे?
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
– परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
– प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
– ऑनलाईन परीक्षा तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.) 

Leave A Reply

Your email address will not be published.