बातमी आनंदाची! लसींच्या वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात 

कोविशिल्ड लसींचे ६ कंटेनर आणि ३ विमाने वितरणाच्या मार्गावर 

0

नवी दिल्ली ः संपूर्ण जग करोना लसीची वाट पाहतंय. भारतात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष करोना लसीला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीनर केंद्राकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत. केंद्राकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाल्यानंतर वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लसींनी भरलेले ६ कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता ५६.५ लाख डोस घेऊन जाण्यासाठी ३ विमान कंपन्या सज्ज झालेल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात कोविडयोद्ध्यांनी लस दिली जाणार आहे. त्यासाठीच कोविशिल्डचं देशात वितरण सुरू झालं आहे. सीरमकडून ही लस देशभरात पोहोचली जाणार नाही. आज (१२ जानेवारी) एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे ५६.५ लाख डोस वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. यात पुण्यातून विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.

करोना लसीकरणाची देशाभरात तयारी सुरू झालेली आहे. यापूर्वी विविध राज्यांमध्ये करोना लसीकरणाची ड्राय रन घेऊन केंद्राने खात्री केली होती. त्यानंतर देशभरात करोना लसीकरणाची प्रत्यक्ष सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सीरम इन्स्टिट्यूटमधून लसींचे सहा कंटेनर बाहेर पडलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.