पिंपरी : कोरोणा महामारीने जगभरात थैमान घातले होते.त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊन झाला खरा पण त्याने सुद्धा काही रुग्ण कमी झाले नाही. कितेत दिवसांच्या प्रयत्नांना यश आले.आणि कोरोना वरील लसीचा शोध लागला.
आज पासुन देशभरात लसीकरणाला सुरूवात झाली. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात लसीकरणाचे उद्घाटन समारंभ नुकताच पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते संपन झाला.
यावेळी पिंपरी चिंचवडचे आरोग्य अधिकारी पवन खासदार श्रीरंग बारणे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना पक्षनेते मयुर कलाटे, विरोधी पक्षनेते राजू मिसळ आरोग्य कर्मचारी,आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्तांनी पत्रकारांनाशी संवाद साधला त्यांनी कोरोनावरील लसीकरणाला आज पासुन देशभरात सुरुवात झाली आहे. आणि पिंपरी चिंचवड मधील ८ रुग्णालयंमध्ये देखील सुरुवात झाली आहे.प्रत्येक लसीकरण केंद्रावर एका दिवसाला शंभर जणांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्यात १५००० लस पिंपरी चिंचवड शहारासाठी उपलब्ध झाल्या आहेत. आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. असे सांगितले.
तसेच पिंपरी चिंचवडचे आरोग्य विभागाचे अधिकारी पवन साळवे पहिल्यांदा लस घेतली. लसपासुन कोणताही साईड इफेक्ट जाणवत नाही.लस अगदीच सुरशित आहे.अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.