मुंबई : पुणे शहर हे IT हब होत आहे. यातच अनेक IT कंपन्या फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यात आघाडीवर आहेत. आता Google सारख्या नामांकित आणि सर्वात मोठी असणाऱ्या कंपनीने अधिकाधिक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे Google लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करणार आहे.
Google ने सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची योजना जाहीर केली, जे प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करेल. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे, ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचं शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता अधिक आहे.
सध्या देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती सुरु आहे. त्यापाठोपाठ आता पुण्यातील ऑफिस सुरु झाल्यानंतर इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे.
एक IT हब म्हणून, पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला उच्च प्रतिभेचा वापर करण्यास सक्षम करेल कारण आम्ही आमच्या वाढत्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा विकसित करत आहोत.” असं भारतातील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP अनिल भन्साळी यांनी म्हंटलं आहे, ग्राहक त्यांचे विश्वासू भागीदार म्हणून Google क्लाउडकडे वळतील असे उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असंही त्यांनी सांगितलं आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कंपनीने IBM चे वरिष्ठ कार्यकारी सुब्रम नटराजन यांची भारतातील कामकाजासाठी ग्राहक अभियांत्रिकी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच Google ने गेल्या वर्षी देशातील दुसरा क्लाउड एरिया सुरु केला आहे. दिल्ली-NCR मध्ये आणि सरकारी क्वार्टरच्याजवळ सर्व आकारांच्या व्यवसायांना विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देण्यासाठी गूगलनं हे सुरु केलं आहे.
विशेष म्हणजे आता या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत Google पुण्यातही आपलं क्लाउड संबंधी ऑफिस सुरु करणार आहे. त्यामुळे राज्यातील आणि देशभरातील अनेक तरुण तरुणींना, फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी नोकरीची दारं उघडणार आहेत.