मुंबई ः अभिनेत्री कंगणा राणौत, संपादक अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात न्यायालयनं दिलेल्या निर्णयावर भाजपाच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. राऊत म्हणाले की, ”सीबीआयने स्वतःचे धिंदवडे काढले आहेत. ईडीसारख्या संस्था कळसूत्री बाहुल्या बनल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयावर लोक संशय घेत आहेत, या सर्व संस्था राष्ट्राचा स्तंभ नसून सत्ताधाऱ्यांच्या चाकर बनल्या तर अराजकतेच्या स्फोट होईल”, अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणात भाजपावर निशाषा साधत पुढे म्हणाले की, ”भाजपाची प्रचारक भारतीसिंह आणि तिचा पती ड्रग्ज प्रकरणात सापडले. तसेच त्यांच्या घरात गांजादेखील सापडला. ते दोघेही २४ तासांत बाहेर पडले आणि रिया चक्रवर्तीच्या घरात अमली पदार्थ सापडले नाहीत, हे विशेष. याचा सरळ अर्थ असा की, कायदा आणि न्यायालयावर सरकारचे नियंत्रण आहे. सरकारच्या हातात त्याचा रिमोट कंट्रोल आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.