पुणे ः ” केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. कदाचित त्यांच्याकडे योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करू शकलो असतो. पण, एकंदरीत लोकं काय निर्णय घेतला पाहिजे सांगत आहेत. पण शासन काय निर्णय घ्यायचा हे ठरवत नाहीये. दुर्दैवाने सरकार फक्त आदेश काढत आहेत”, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
कोरेगाव भिमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर गेले होते. त्यावेळी आंबेडकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. करोनामुळे यंदाचा कोरेगाव भीमामधील विजयस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून रद्द करण्यात आला. साध्या पद्धत्तीने आणि प्रतिकात्मक विजयस्तंभाला अभिवानदन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “१ जानेवारी देशातील सामाजिक गुलामगिरीतूर मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो. मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरू व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं दिसत आहे, करोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही”, असेही मत आंबेडकरांनी मांडले.