सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला शासनाची कात्री

0

मुंबई : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव हे सर्व असताना सरकार आणखी सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान काही प्रमाणात कमी ठरत ते बंद केले जात आहे.

एप्रिल २०२० ला एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ७८९.५० रुपये दिल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून १९९.१० रुपये जमा होत होते. जानेवारी २०२१ मध्ये एका सिलिंडरसाठी ७४६ रुपये द्यावे लागत आहेत. परंतु बँक खात्यात मात्र केवळ ४० रुपये १० पैसे जमा होत आहेत. साधारणपणे एका ग्राहकाला एका वर्षात अनुदानाच्या १२ सिलिंडरची तरतूद आहे. परंतु अनेक लोक वर्षभरात केवळ सात ते आठ सिलेंडरचाच वापर करतात. उर्वरित चार ते पाच सिलिंडरचा काळाबाजार होतो.

घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमतीवर अवलंबून असते. कधी १०० रुपये तर कधी पाच रुपयांचे अनुदान दिले जाते. पूर्वी ६१२ रुपयांपेक्षा अधिक किमतीवर ग्राहकांना अधिक अनुदान मिळत होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्याने अनुदान कमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.