सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास या आठवड्यात चांगली संधी

0

नवी दिल्ली : सोन्यामध्ये गुंतवणूक ही अत्यंत पारंपरिक आणि फायद्याची मानली जाते. भारतीयांचा विशेष कल याकडे असतो. दरम्यान सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, अशावेळी स्वस्तात सुवर्णखरेदीची संधी मिळण्याची अनेकजण वाट पाहत असतात. दरम्यान जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

या योजनेमध्ये तुम्ही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोनंखरेदी करू शकता. सरकारकडून ही संधी उपलब्ध केली जात आहे. ही योजना म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड . ही योजना पुन्हा एकदा पाच दिवसासाठी 24 मे ते 28 मे दरम्यान खुली केली जात आहे. या आर्थिक वर्षातील SGB चा पहिला टप्पा 17 मे ते 21 मे रोजी जारी करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील किंमती देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. उद्यापासून ही योजना खुली केली जाणार आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड च्या दुसऱ्या टप्प्यात 4,842 रुपये प्रति ग्रॅम या दराने सोनेखरेदी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यादरम्यान हे मुल्य 4,777 रुपये प्रति ग्रॅम होते. याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,792 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.