चाकण पोलिसांची मोठी कामगिरी ; कोट्यावधी रुपयांचा गुटखा जप्त…!

0

पुणे : आरएमडी आणि सुंगधी सुपारी असणारा गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. नाशिक-पुणे महामार्गावरून विक्रीसाठी घेऊन जात असताना ९१ लाख २० हजार रुपयांचा गुटखा चाकण पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.

गणेश विठठल भाडळे (३२, रा. कोयाळी ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरून पुणे येथे अवैधरित्या गुटख्याचा टेम्पो जाणार असल्याची माहिती एका खबऱ्याकडून चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी अधिकारी व अंमलदार यांना बातमीची खात्री करून कायदेशिर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

मिळालेल्या माहितीच्या आधारे चाकण पोलीसांनी वाकी खु परिसरात नाशिक पुणे महामार्गावरील रोहकल फाटयाचे स्पिड ब्रेकर जवळ सापळा रचुन टेम्पोवर याचेवर छापा टाकला. टेंम्पोची तपासणी केली असता सदर टॅम्पो मध्ये आरएमडी पान मसाला व एम सुगंधी तंबाखु असलेला एकुण ९१ लाख २०० हजार रुपयांचा गुटख्याचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला माल मिळुन आला आहे. सदरचा गुटखा व वाहतुक करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा १ कोटी १ लाख २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त, संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न ज-हाड, विक्रम गाकयवाड, पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, पोना भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, चेतन गायकर, नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, निखील वर्पे यांनी केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.