मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज (ता. ३१) मार्च झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. यामुळे आता ‘मास्क’ची सुटका होणार आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनेचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, ”आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त मिरवणूका जोरात काढा,” असे आव्हाड म्हणाले आहेत.
त्याच बरोबर आता नागरिकांना मास्क पासूनही मुक्ती मिळाली आहे. मास्क ज्यांना वापरायचा असले त्यांनी वापरावा, त्याची सक्ती केली जाणार नसल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे. गुढीपाडव्या निमित्त मिरवणूक काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.