गुजरात : धार्मिक स्थळ हटविण्याच्या नोटिसीवरून राडा; दगडफेक, वाहनांची तोडफोड -जाळपोळ

0

गुजरात : गुजरातमधील जुनागढमध्ये धार्मिक स्थळ हटवण्याच्या नोटीसवरून गदारोळ झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा 300 हून अधिक लोक धर्मस्थळाजवळ जमले आणि त्यांनी नोटिशीला विरोध केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. दगडफेक सुरू केली.

पोलिसांनी बचावासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. यादरम्यान एकाचा मृत्यू झाला. डीएसपीशिवाय चार पोलिस जखमी झाले. आतापर्यंत 174 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रत्यक्षात जुनागडमधील माजेवाडी गेटजवळील दर्गा पाडण्याची नोटीस जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली होती. यानंतर जमलेल्या जमावाने रस्त्यावरून जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी जखमी झाले. यानंतर पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि मोटारसायकलीही जाळण्यात आल्या.

जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला असता जमावाने सोडाच्या बाटल्या फेकून त्या पेटवून दिल्या. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.