मुंबई इडियन्सला हरवून ‘गुजरात टायटन्स’ फायनल मध्ये

चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना

0

नवी दिल्ली : आयपीएल-16 मधील क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी हरवत फायनलचे तिकिट पक्के केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरातने विजयासाठी दिलेल्या 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकांत सर्व गडी गमावून 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.

 

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 61 धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने 43, कॅमेरून ग्रीनने 30 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्यानंतर राशिद खानने आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2, तर जोशुआ लिटलने 1 विकेट घेतली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा करत मुंबईला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दिले.

 

याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर नेहल वढेरा पहिल्या षटकात 4 धावांवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. तर दुसऱ्या षटकात हार्दिकच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीन रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर शमीने तिसऱ्या षटकात रोहित शर्मालाही 8 धावांवर आऊट केले. तर सहाव्या षटकात राशिद खानने तिलक वर्माला 43 धावांवर आऊट केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनने डाव पुढे नेत चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात कॅमेरून ग्रीनला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तर पंधराव्या षटकात मोहित शर्माने सूर्यकुमार यादवला 61 धावांवर, तर विष्णू विनोदला धावांवर 5 बाद केले. तर पुढच्याच षटकात राशिद खानने टिम डेव्हिडला 2 धांवावर बाद केले. तर सतराव्या षटकात मोहित शर्माने क्रिस जॉर्डनला 2 धावांवर, तर पीयूष चावलाला शून्यावर बाद केले. मोहित शर्माने एकोणिसाव्या षटकात कुमार कार्तिकेयला 6 धावांवर बाद केले. मुंबईला 18.2 षटकांत 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.

 

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा करत मुंबईला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दिले. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 129 धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शनने 43, हार्दिक पंड्याने 28, वृद्धिमान साहाने 18 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवाल आणि पीयूष चावलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

 

प्रथम फलंदाजी करताना गुजरातला ओपनर शुभमन गिल आणि वृद्धिमान साहाने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात वृद्धिमान साहाला 18 धावांवर बाद करत पीयूष चावलाने ही जोडी फोडली. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने डाव पुढे नेला. शुभमनने हंगामातील तिसरे शतक पूर्ण करत जोरदार फटकेबाजी केली. त्याने 60 चेंडूंत तडाखेबंद 129 धावा केल्या. सतराव्या षटकात आकाश मधवालने त्याची विकेट घेतली. तर एकोणिसाव्या षटकात साई सुदर्शन 43 धावांवर रिटायर्ड आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि राशिद खानने शेवटपर्यंत खेळत संघाची धावसंख्या 233 वर नेली. हार्दिक पंड्याने 28, तर राशिद खानने 5 धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.