पुणे : संशयावरुन हटकले असता दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत कोयता फेकून मारला. तर पोलिसांनीही दरोडेखोरांवरगोळीबार केला. ही घटना वारजे येथील रोजरी स्कुलजवळील म्हाडा वसाहत परिसरात शनिवारी रात्री एक वाजता घडली. या घटनेतपोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पळून जाणार्या ५ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले आहे.
पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुणे शहरात नाकाबंदी केली होती. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्तसंदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीसआयुक्त सुनील तांबे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे सहकार्यांनी वारजे येथील म्हाडा वसाहतीमध्येकोंबिग ऑपरेशन राबवत होते.
गुन्हेगारांची चेकिंग करीत असताना त्यांना रोझरी स्कुलजवळ काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेव्हा त्यांना ताब्यातघेण्यासाठी पोलिस त्यांच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्नकेला.यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला.तोपोलीस कर्मचारी कट्टे यांना लावून ते जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील ५ जणांना पकडले.
इतर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या ५ जणांकडून एक गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे, कोयते, कटावणी, स्क्रुड्रायव्हर, हातोडा असा माल जप्त केला आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीने हे दरोडेखोर आले होते. हे दरोडेखोर सराईतगुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.