रुपीनगर परिसरातून 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त; आमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
'Talk maharashtra' वृत्ताची दखल घेत कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आमली पदार्थ विरोधी पथकाने गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे. निगडी, रुपीनगर परिसरात छापा मारून 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
दलपत रामाजी परिहार (32, रा. रुपीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. ‘Talkmaharashtra.com’ मध्ये शहरात खुलेआम गुटखा तसेच गांजाची विक्री होत असून याकडे स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा कानाडोळा करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच यातील बड्या धेड्यांवर कारवाई केली जात नसून म्हाळुंगे आणि रूपीनगर, चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर याची विक्री सुरु असल्याचे नमूद केले होते. यवृत्ताची दखल घेत शहरात कारवाई जोरदार सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हाऊसिंग सोसायटीजवळील गोडाऊनवर छापा मारून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी आरोपीकडून 16 लाख 35 हजार रुपयांचा आरएमडी, विमल, शौक कंपनीचा गुटखा व कार असा एकूण 23 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यानुसार चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कामगीरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक सतीश पवार, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडिक, अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, संतोष दिघे, संदीप पाटील, मनोज राठोड, अनिता यादव, प्रसाद कलाटे, विजय दौडकर, प्रसाद जगलीवाड, अशोक गारगोटे, पांडुरंग फुंदे, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे या पथकाने केली आहे.