अडीच लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखा पाचची कारवाई

0

पिंपरी : दोन आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई मुकाई चौका जवळ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने केली आहे.

सुरेश मोहनलाल बिश्नोई (19, रा.किवळे), आसुराम चुनाराम बिश्नोई (30, रा. किवळे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर सरवन बिश्नोई हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून बंदी असतानाही बेकादिशीररीत्या गुटखा विक्री होत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस नरीक्षक रामदास इंगवले यांनी तपास पथक तयार करून मुकाई चौक ते विकास नगरकडे जाणाऱ्या रोडजवळील एका बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींग जवळ छापा मारला.

यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले.कारवाईत पोलिसांनी 2 लाख 43 हजार 662 रुपयांचा गुटखा, 30 हजार रुपयांची दुचाकी व साडे सहा लाखाची कार असा एकूण 9 लाख 23 हजार 172 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास देहुरोड पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.