एका दिवसासाठी सीबीआय आणि ईडीच्या ताब्यात द्या; भाजपचे निम्म्याहून अधिक नेते तुरुंगात जातील : केजरीवाल
नवी दिल्ली : दिल्लीत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत आहे. एमसीडी निवडणुका आणि गुजरात निवडणुका पाहता आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार हल्ले सुरू आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.
एका दिवसासाठी सीबीआय आणि ईडीच्या ताब्यात दिल्यास भाजपचे निम्म्याहून अधिक नेते तुरुंगात जातील, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपचे लोक खूप भ्रष्ट आहेत. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी ही माहिती दिली. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही गेल्या पाच वर्षात दिल्ली महानगरपालिकेला एक लाख कोटी रुपये दिले. पण या लोकांनी सगळे पैसे खाऊन टाकले. लोकांनी थोडे काम केले असते तर कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता. ते म्हणाले की, तुम्ही भाजपला विचारा की दिल्ली सरकारने एमसीडीला दिलेले एक लाख कोटी रुपये कुठे गेले?
सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात सुविधा दिल्या जात असल्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, तुरुंगात जैन यांना कोणतीही व्हीव्हीआयपी सुविधा दिली जात नाही. ते म्हणाले की, जेल मॅन्युअलनुसार जैन यांना सुविधा दिल्या जात आहेत. जर तुरुंगात व्हीव्हीआयपी कल्चर बघायचे असेल तर सीबीआयचे चार्जशीट पाहावे की अमित शहा तुरुंगात असताना काय म्हणाले होते. जेलमध्ये त्याच्यासाठी डिलक्स जेल बनवण्यात आले होते.
एमसीडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेतली. म्हणाले- भाजप अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट रचत आहे.