कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे पटेल यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, गुजरात काँग्रेस काळासोबत जायला तयार नसल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाच्या संमतीनतंरच पटेल यांनी पवारांची भेट घेतल्याचे समजते. गुजरात कॉंग्रेसमध्ये पक्षात लागलेली गळती पाहता कॉंग्रेसला पुर्नसंजीवनी देण्यासाठी पटेल यांचे नेतृत्व महत्वाचे मानले जात आहे.पवारांची भेट केवळ राजकारणात मार्गदर्शन घेण्यासाठीची भेट असावी, अशी चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : मुंबई दौऱ्यावर असलेले गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी गुरुवारी (दि. 11) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. पटेल आणि पवार यांची ही भेट राजकीय असल्याची समजते. या भेटीमळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी काही दिवसांमध्ये पटेल यांना गुजरातमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत असून, या पार्श्वभूमीवर पवारांची भेट राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाची मानली जात आहे.