हर्ष लिम्बाचिया आणि ट्रोलर्समध्ये जुंपली

0

मुंबई ः ड्रग्ज प्रकरणात अडकेले विनोदी अभिनेत्री भारती सिंह आणि पती हर्ष लिम्बाचिया यांना नुकताच जामीन मिळाला आहे. हर्षने पत्नी भारतीसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरून दोघांना सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रचंड ट्रोल केले. त्याने हर्षने ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिले आहे.

हा फोटो खरंतर रोमॅंटिक मुडमध्ये काढलेला होता आणि हर्ष रोमॅंटिक कॅप्शनदेखील दिलेली होती. मात्र, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ट्रोल केले. हर्षने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ”आपण जेव्हा सोबत असतो तेव्हा कोणत्याही गोष्टीने आपल्यावर फरक पडत नाही.” या वाक्यावर हर्ष आणि भारतीला ट्रोल केले.

ड्रग्ज प्रकरणात दोघांना उसकविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हर्षने चांगलेच उत्तर दिले. भारती तू कोणता माल खातेस, अशी प्रतिक्रिया आल्यानंतर त्यावर हर्षने सांगितले की, जे तुला मिळत नाही, तो माल खाते. असा सुरात हर्ष ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.