मुंबई ः मागील दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला ओटीटीवर वेबसिरीज हा प्रकार आपल्या भारतीय प्रेक्षकांवर चांगलाच रुजलेला आहे. एकापेक्षा दमदार, कसलेल्या अभिनेत्यांच्या वेब सिरीज मनोरंजन क्षेत्रात बाॅक्स ऑफिसला मागे सोडतंय की, काय अशी चर्चा सुरू आहे.
या वेबसिरीजच्या २०२० मधील टाॅप-१० सिरीज आईएमडीबीवर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिग्दर्शक हंसल मेहता यांची ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ प्रथम स्थानावर आलेली आहे.
या वेबसिरीजला आईएमडीबीवर यूजर्स यांनी रेटिंग मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे हरी सिरीज प्रथम स्थानावर आहे. १० पैकी ९.५ रेटिंग मिळालेलं आहे. हर्षद मेहताचा १९९२ मधील शेअर बाजारातील घोटाळा या वेब सिरीजच्या माध्यमातून अफलातून रेखाटला आहे.
यामध्ये अमेझाॅन प्राईम व्हिडीओची ‘पंचायत’ वेब सिरीज दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर हाॅट स्टारची ‘स्पेशल ऑप्स’ तिसऱ्या स्थानावर आलेली आहे. तसेच या यादीत ‘बंदिश बॅडिट्स’ चौथ्या तर, पाचव्या स्थानावर ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन आहे. आईएमडीबीचे संस्थापक कोल नीधम सांगितले की, ”भारतीय सिरीजमध्ये जगभरातून चांगला इंटरेस्ट वाढत चालला आहे.यावर्षी ‘स्कॅम १९९२’ ही सिरीज लोकप्रिय ठरलेली आहे.”