मुंबईत कहर; दिवसभरात 8646 रुग्ण

0
मुंबई : मुंबईत आज कोरोनाचे ८,६४६ नवे रुग्ण आढळून आले असून १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून महापालिका कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईत गुरुवारी 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईतील कोरोनाच्या अक्टीव्ह रुग्णांची संख्या आता 55 हजारांवर गेली आहे. केवळ मुंबईच नाही तर मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढतोय. याच शहरांमधून मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग मुंबईत येत असतो. त्यामुळे मुंबईत तूर्तास लॉकडाऊन जरी नसला, तरी उद्यापासून निर्बंध कडक करण्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत.

मुंबईत दररोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही 5 हजाराच्या घरात आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाणही 85 टक्क्यांवर घसरलेले आहे. दररोज मृतांची संख्याही 10च्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली. मात्र आता महापौरांनीच निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.