मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकारणात खळबळ उडाली. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे अजून लहान आहेत असे जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे दोघांतील वाकयुद्ध वेगवेगळ्या मार्गाने आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत आपले बस्तान बसवत राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर ठाकरे गट शिंदेंच्या शिवसेनेवर तुटून पडला. आदित्य ठाकरे हे तर थेट भिडले आणि एकनाथ शिंदेंना खुले आव्हान देत यात्रा काढत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
आदित्य ठाकरेंनी गोप्यस्फोट केला की, एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या बंडाबाबत माजी मंत्री, ठाकरेगटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘तो अजून लहान आहे’ असे एका वाक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात एक नंबरचं विकासकाम सुरु आहे, समृद्धी हायेव, शिवडी न्हावा शेवा, पुणे रिंग रोड, मेट्रोचे जाळे विणण्याचं काम सुरु आहे. बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. बंद पडलेले सर्व प्रकल्प आम्ही वेगाने पुढे नेत आहोत. याचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला होईल. लाखो-करोडोंची गुंतवणूक या महाराष्ट्रात येतेय, उद्योगपती महाराष्ट्राला प्राधान्य देत आहोत.