पीएमआरडीएच्या विकास आराखडा हरकतींवर 14 मार्च पासून सुनावणी

0

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवर 14 मार्च पासून सुनावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 14 ते 16 मार्च दरम्यान कारेगाव, ढोकसांगवी, रांजणगाव गणपती आणि शिरुर येथील हरकतींवर पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात सकाळी 11 ते 2 आणि 3 ते 6 या वेळेत ही सुनावणी होणार आहे.

 

पीएमआरडीएने मागील 2 ऑगस्ट ला आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. तसेच या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी नगर नियोजन समितीची देखील नियुक्ती केली आहे. हरकती व सूचना घेतलेल्या नागरिकांना सुनावणी बाबतचा तपशील पोस्ट आणि एसएमएसद्वारे कळविण्यात आला आहे.

पीएमआरडीएने सुनावणी साठी एरियानुसार वेळापत्रक तयार केले आहे. तसेच ज्यांना सुनावणी संबंधित नोटीस मिळाली नसेल त्यांनी देखील उपस्थित राहावे. पहिल्या टप्प्यात कारेगाव, ढोकसांगवी , रांजणगाव गणपती आणि शिरुर येथील नागरिकांनी वरील वेळेत व पत्त्यावर आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.